Thursday, November 26, 2009
भारतीय संविधान दिन चिरावु होवो .....!!!
आज सकाळी कोल्हापुरातील प्रसिद्ध दसरा चौका मध्ये गेलो होतो .तेथे भारतीय संविधान दिन साजरा होत होता .छत्रपति शाहू महाराजांच्या पुतल्यास पुष्पहार घालण्यात आले . त्यानंतर सरनाम्यांचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत वाचन करण्यात आले .२६/११ मध्ये शहिद झालेल्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .ह्या दोन्ही घटना पाहिल्यानंतर काही प्रश्न समोर उभे रहात होते .आपण घटनेतील प्रत्येक कलमांची अंमलबजावणी करतो का? दहशतवाद का?फोफावतोय याचा विचार कधी आपण करत नाही.या विचारात असताना एक निमभिकारी आमदारांच्या कड़े जावून हात पसरतो .परन्तु त्याकडे लक्ष न देता आमदार पुढे सरकतात .सामाजिक न्यायाच्या दिशेने जाणारे संविधान आपण सर्व सामान्यांकडे नेण्यास का कमी पडत आहोत .याचा ही विचार करणे गरजेचे आहे .संविधान हे सर्व सामान्यांच्या हिताचे संरक्षण करण्याचे माध्यम आहे .जे असुरक्षित आहेत. ते इतराना स्वस्थ बसु देणार नाहीत .त्यासाठी सर्वांची विकासाभिमुख हिताची जोपासना केलीतरच भारतीय संविधान दिन साजरा केल्याचे समाधान वाटेल ....!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment