Thursday, November 26, 2009

भारतीय संविधान दिन चिरावु होवो .....!!!

आज सकाळी कोल्हापुरातील प्रसिद्ध दसरा चौका मध्ये गेलो होतो .तेथे भारतीय संविधान दिन साजरा होत होता .छत्रपति शाहू महाराजांच्या पुतल्यास पुष्पहार घालण्यात आले . त्यानंतर सरनाम्यांचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत वाचन करण्यात आले .२६/११ मध्ये शहिद झालेल्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .ह्या दोन्ही घटना पाहिल्यानंतर काही प्रश्न समोर उभे रहात होते .आपण घटनेतील प्रत्येक कलमांची अंमलबजावणी करतो का? दहशतवाद का?फोफावतोय याचा विचार कधी आपण करत नाही.या विचारात असताना एक निमभिकारी आमदारांच्या कड़े जावून हात पसरतो .परन्तु त्याकडे लक्ष न देता आमदार पुढे सरकतात .सामाजिक न्यायाच्या दिशेने जाणारे संविधान आपण सर्व सामान्यांकडे नेण्यास का कमी पडत आहोत .याचा ही विचार करणे गरजेचे आहे .संविधान हे सर्व सामान्यांच्या हिताचे संरक्षण करण्याचे माध्यम आहे .जे असुरक्षित आहेत. ते इतराना स्वस्थ बसु देणार नाहीत .त्यासाठी सर्वांची विकासाभिमुख हिताची जोपासना केलीतरच भारतीय संविधान दिन साजरा केल्याचे समाधान वाटेल ....!!!

Monday, November 23, 2009

पदरा आडच जीण.........!!!!!!

आईच्या पदरा आड़ आपण लहानाचे मोठे होत असतो ........तिथेच खरेतर चांगले संस्कार घडत असतात ......त्याच शिदोरीवर आयुष्यभर ..... जीवन जगत असतो .....हे संस्कार कोणतीही चुक करू देत नाहीत ........परंतु .....स्वार्थ असल्यास काही लोक हे..... संस्कार विसरायला लागतात .....आणि कुणाच्यातरी फायद्यासाठीं त्यांच्याच पदराला धरून जाणारे ......काही जन असतात .....हे जीण तसं गुलामिचच असते .....जे गुलाम असतात ...... त्याना सुद्धा वाटत असते ...की... आपलाही पदर कोणी ...तरी धरला पाहिजे .....मग ...ते आपल्या हाताखालीं काही जन ......मजबुरे वाले घेत असतात .....येथूनच खरे तर माणूस .....संस्कारहीन.... होत जातो ......त्याला समाजाचे हित ..न ..दिसता स्वहितच ...दिसत असते ........म्हणून वाटते....... ,आईच्या पदरा आडचे जिणे लाख मोलाचे असते .......!!!!

कशासाठी ......?

नुकताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी आयबीएन लोकमत वर भ्याड हल्ला केला .तो हल्ला संविधान अन्वये अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला होता .या शिवसेनेची मान्यता निवडणूक आयोगाने काढून घ्यावी. कारण त्यांनी अतिरेकी संघटने प्रमाणे हल्लाची जबाबदारी स्वीकारली आहे .

Thursday, November 12, 2009

राजकारणातील गणिताचं सूत्र ......!!!!!

ते स्वत:च्या फायद्यासाठी

करतात बेरजेचे राजकारण

फायदा झाल्या नंतर

दुसरयाकडे दिसताच

ते करतात वजाबाकीच राजकारण

स्वत:च 'कौतुक' करून घेण्यासाठी

घेतात हाताखाली मग हातातलेच

येतात काखेखाली

मग सुरु होतं गुनाकाराच राजकारण

जो आपल्या fअयाद्याचा नाही

मग त्याच्या बरोबर करत राहतात

भागाकराच राजकारण गोटा तल्या माणसांना

घालतात महिरापी कंसात

परन्तु त्याना तरी कुठं

शिकवतात सगलेच डाव

मग जेंव्हा शिश्यच करतात

गुरु वर कुरघोडी

तेव्हां मात्र एक हछः

असतो त्यांच्याकडे

तो मात्र शाहान्याला दिसतो

मग इथुनच सुरु होत

राजकरनातील गनिताच सूत्र ........!!!!!!

Tuesday, November 10, 2009

.......रीतच न्यारी .....

हिवाळ्यात पाउस की पावसाळ्यात हिवाला समजतच नाही ।

पेरनीच्या हंगामात पेरलं तरी रानात काही उगवतच नाही।

श्रीमंताची श्रीमंती आर्थिक मंदित ही संपतच नाही ।

गरिबांच्या घरात दिवा कधी प्रकाशमान होतच नाही ।

Monday, November 9, 2009

ऐसा 'राज' नही चलेगा....

लोकशाहीचे प्रतिबिंब असलेल्या विधिमंडलामध्ये मनसेचा दिलसे राजकीय कारभार न होता ,भारतीय राज्य घटनेचे उल्लंघन करून सुरु झालेल्या राजकीय वाटचालीस फार काही भवितव्य आहे असं वाटत नाही......प्रश्न राहिला तो प्रतिनिधि निवडून दिलेल्या जनतेचा .....जनता भाबडी राजकीय शिक्षन नसल्याने एक मिनिटाच्या
लोकशाहीसाठी आपली अधिसत्ता दुसरयाच्या पायावर ठेवते .......अशा नेत्याना 'राज'कारण करण्यात 'विना 'कारण रस असतो .पण असे कायदेशीर नसताना .......''ऐसा 'राज' नहीं चलेगा ......''

Friday, November 6, 2009

आईचा पदर इंद्रधनुष्य

शिवाजी विद्यापिठात अवतरली । सप्तरंगी इंद्रधनुष्यची उधलन !! राज्यातील प्रत्येक विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांच्या । कलागुणाना मिळाली उजलन !! संस्कृतीची करी जोपासना !शाहुंची तया नगरी!! मिळाली युवकांना सांस्कृतिक मेजवानी ! तव देती प्रोत्याहन करवीरनगरी!! वादविवाद,स्थल चित्रण लघुनाटिकासह!वत्त्कृत्व व्यंगचित्र, प्रश्नमंजुषा आकार घेती!!समूह गायन .शास्त्रीय गायन सर्जनशील नृत्य साकाराते! काव्य वचन ,रांगोलीतुन कलाविष्कारची उधलन होती!! युवा महोत्सव देतो संदेश "लेक वाचवा"!सृजनशील मनात आता हेच तुम्ही बिंबवा ॥ घराघरात उधलन होऊ दे इन्द्रधनुश्याची !गरज आहे देशाला आता आईची ॥

आयुष्याच्या वाटेवर ..........

Thursday, November 5, 2009

इन्द्रधनुश्याला जातीची किनार ....!!!!

विद्यापिठात आज सकाळी चहाला गेल्यानंतर, एक संवाद ऐकला,एक झाडूवाली दुसऱ्या झाडूवालीला विचारत होती, तुझी जात कोणती ? दुसरीने सांगितल्यानंतर ती आनंदून गेली, कारण दोघींची जात एकच होती .ह्या दोघीही इंद्रधनुष्य युवा महोत्सवास झाडू वाल्या म्हणुन आल्या होत्या ......यातून एक गोष्ट लक्षात येते की ,जात जात नाही ...... तर ती एकमेकाला जवळ करते ......युवा महोत्सवात लोककला आहेत ......लोककला टिकल्या पाहिजेत...... पण जाती घट्ट होऊंन नव्हे . त्या नष्ट होऊंनच .....!!!!!

बस 1

बस मधला किस्सा ,मी कॉलेजलाc गावाहून तालुक्याला,चाललो होतो ....बस मध्ये खुप गर्दी होती .मी केबिन मध्ये बसलो होतो . तालुक्याचे ठिकाण आल्यानंतर तेथे टिकिट चेकर आले ,सगल्यांची टिकिट चेक करत असताना मी बस मधून खाली उतरलो .तेंव्हा त्यानी मला विचारले कोठे बसला होता .तेव्हा मी सांगितले की केबिन मध्ये तेव्हा ते म्हणाले ,अहो कोणत्या गावात बसला ? एकच हास्य पिकले ....

निवद

किती 'खाती' कुणी खायची,
यातच 'गृह' कलह वाढला ,
एकाच दुरडित निवद मात्र दाखवायचा राहिला .

Wednesday, November 4, 2009

कवडसा

पहिलाच प्रयत्न एक कवडसा शोधण्याचा.
पाहिलाच प्रयत्न, एक कवडसा शोधण्याचा